आयआयटीमध्ये जपानी विद्यार्थ्याचा मृतदेह सापडल्याने खळबळ

547
file photo

देशातील एक नामांकित शिक्षण संस्था असलेल्या आयआयटी अर्थात भारतीय प्रौद्योगिकी संस्थानात जपानी विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ माजली आहे. कोता ओनोदा असं या विद्यार्थ्यांचं नाव आहे.

कोता हा 22 वर्षीय विद्यार्थी जपानच्या गिफू विद्यापीठाचा पदव्युत्तर पदवी शाखेचा विद्यार्थी होता. युनिव्हर्सिटी एक्सचेंज प्रोग्रॅम अंतर्गत तो आयआयटी गुवाहाटी येथे जैवविज्ञान आणि जैवअभियांत्रिकी विभागात इंटर्नशिप करत होता. ही इंटर्नशिप 30 नोव्हेंबर रोजी संपणार होती. पण, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी विद्यार्थी वसतीगृहाच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह लटकलेला आढळला.

पोलिसांनी त्याच्या मृतदेहाला ताब्यात घेतलं असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. नवी दिल्ली येथील दूतावासाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या