
कागदपत्रे, छायाचित्रे स्कॅन आणि शेअर करण्यासाठी चिनी ‘कॅमस्कॅनर’ आणि ‘अडोब स्कॅन’ ही परदेशी App वापरली जात होती. त्यावर बंदी आल्यानंतर स्कॅनिंगसाठी या परदेशी Appना तोडीस तोड अशा स्वदेशी अॅपची गरज निर्माण झाली होती. पवई येथील आयआयटी मुंबईच्या विद्यार्थींनी ती गरज पूर्ण केली आहे.
आयआयटी मुंबईत अंतिम वर्षाला शिकणाऱ्या रोहित कुमार चौधरी आणि केविन अगरवाल या विद्याथ्र्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून ‘एअर स्कॅनर’ हा उत्कृष्ट फीचर्स असलेला अॅप बनवला आहे. ‘एअर स्कॅनर’ हा पूर्णपणे स्वदेशी अॅप आहे. प्लेस्टोअरवरून हे अॅप bit.1y/air_iitb या लिंकने डाऊनलोड करता येऊ शकते.
हे फीचर्स आहेत अॅपमध्ये…
- कागदपत्रे स्कॅन व शेअर करण्याची सुविधा
- कागदपत्रावरील कोणत्याही शब्दाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर त्या शब्दावर टॅप केल्यास त्याची उदाहरणांसह संपूर्ण माहितीही वापरकर्त्याला जाणून घेता येऊ शकते.
- 40 पेक्षा जास्त भाषांमधील उच्चार आणि अनुवादाचीr व्यवस्था.
- वर्तमानपत्रातील मजकूर क्लिक केल्यास एआय नॅरेटर तो आपल्यासाठी मोठ्या आवाजात वाचून दाखवू शकतो.

























































