पवई आयआयटीच्या ‘टेकफेस्ट’मध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवई येथील आयआयटी मुंबईच्या ‘टेकफेस्ट’मध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी असणार आहे. जगभरातील 40हून अधिक देशांमधील 300पेक्षा जास्त खेळाडू टेकफेस्टमधील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. त्यात रिमोट कंट्रोलवर धावणारी निट्रो बग्गी आणि रोबोवॉर्सचा समावेश आहे. या खेळांच्या प्राथमिक फेऱया नेपाळ, मादागास्कर आणि बांगलादेश येथे घेण्यात आल्या. प्राथमिक फेऱयांमध्येच 400 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

टोकापर्यंत पोहोचवायचा असतो. या मायक्रोमाऊस चॅलेंज स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया, चीन आणि टय़ुनिशिया येथील स्पर्धक येणार आहेत. या स्पर्धेसाठी सवादोन लाखाची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.

रिमोट कंट्रोल निट्रो बग्गी रेसिंग

इंटरनॅशनल फुल थ्रोटल ही देशातील सर्वात मोठी रिमोट कंट्रोल निट्रो बग्गी रेसिंग स्पर्धा आहे. या स्पर्धेसाठी लागणारा ट्रक हा फक्त आयआयटी मुंबईमध्येच आहे. या वेळी या स्पर्धेसाठी 1.3 लाख रुपयांची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. या स्पर्धेत फ्रान्स, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील स्पर्धक सहभागी होणार आहेत.

रोबोवॉर्स

रोबोवॉर्समध्ये रोबोंची लढाई होणार आहे. रोबोवॉर्स हे टेकफेस्टचे प्रमुख आकर्षण असते. या स्पर्धेसाठी बक्षीसही सर्वाधिक 10 लाख रुपये ठेवण्यात आले आहे. ब्राझीलचा ‘यूएरियर’ आणि इंग्लंडचा ‘रोमिंग रोबो’ यांचीही या रोबोवॉर्समध्ये लढत होणार आहे.