जालन्यात बार मालकाच्या घरावर धाड; 54 हजाराचा अवैध दारूसाठा जप्त

768

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदी असल्यामुळे जीवनावश्यक वस्तूच्या दुकानाशिवाय अन्य व्यवहार पूर्णपणे बंद आहेत. या बंदीतही जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील बारमालकाने आपले हॉटेल बंद ठेवले. परंतु घरातून अवैधरित्या दारू विक्री सुरू ठेवली होती. याबाबत माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी आज सुखापुरीत धाड टाकून कारवाई केली.

यावेळी 54 हजार रुपये किंमतीची देशी व विदेशी दारू असा मोठा साठा जप्त करण्यात आला असून बारमालक तुकाराम चांगले याच्यासह पत्नी, मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहायक फौजदार शेख रजाक,  सुरेश गीते, रंजित वैराळ, बहुरे, अशा जायभाये आदींनी ही कारवाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या