
तब्बल 3 लाख 93 हजारांहून अधिक परदेशी नागरिक डिसेंबर 2021 पर्यंत हिंदुस्थानात बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते, अशी माहिती मंगळवारी केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी दिली. लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात त्यांनी ही माहिती दिली आहे. नित्यानंद राय पुढे म्हणाले, 2021 मध्ये व्हिसाची मुदत संपल्यानंतरही 25,143 परदेशी हिंदुस्थानात राहत होते. 2020 मध्ये 40,239 तर 2021 मध्ये 54,576 परदेशी बेकायदेशीरपणे वास्तव्यास होते. 2019 पासून ते 31 डिसेंबर 2021 पर्यंत बेकायदेशीरपणे राहत असलेल्या परदेशींची एकूण संख्या 3 लाख 93 हजार 431 इतकी आहे. परदेशी कायदा, 1946 अंतर्गत कायदेशीर कारवाई देखील प्रत्येक प्रकरणाच्या गुणवत्तेच्या आधारावर केली जाते. ज्यात देशातून हद्दपारीची खात्री केल्यानंतर अशा परदेशी लोकांची नावे ’ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकली जातात.


























































