
सामना प्रतिनिधी, पूर्णा
गोदावरी नदीमध्ये मागील अनेक दिवसांपासून स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून वाळू लिलाव न होता, त्यामधून अवैधरित्या मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करून टिप्पर जिल्ह्यामध्ये विक्री करण्याचा घाट तस्करांनी घातला आहे. याला केवळ परभणीचे जिल्हाधिकारी एकमेव अधिकारी अपवाद असून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून शुक्रवारी मध्यरात्री म्हणजे आज 1 वाजता पूर्णा-ताडकळस रोडवर मध्यरात्री पकडले. त्या टिप्पर चालकाला त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून पुन्हा पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
पूर्णा-ताडकळस रस्त्यावर पूर्णा नदीच्या पात्रातून अवैध रेती उत्खनन व रीतीचा टिपर परभणी कडे जात असल्याची खबर जिल्हाधिकाNयांना मिळाली जिल्हाधिकारी पी शिवशंकर हे मध्यरात्री एकच्या दरम्यान परभणीहून थेट पूर्णेकडे निघाली. परभणी-ताडकळस मार्गे पुण्याकडे येत असताना हटकरवाडी शिवारात त्यांना अवैध रेती वाहतूक करीत असलेला टिप्पर (एम.एच. 02 वाय.के.9841) आढळून आला. तात्काळ त्याला थांबण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. ट्रक थांबल्यानंतर या ट्रकचा चालक राजू ज्ञानेश्वर सरगर(रा. हटकरवाडी) याला पूर्णा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर गस्तीवर असलेले नायब तहसीलदार वाले यांना या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांनी पूर्णा परिसरात वाळू तस्कर रांक नाकीमध्ये करण्यासाठी त्यांनी विशेष मोहीम पुढे राबविली.
दरम्यान पूर्ण परिसरात वाळूची तस्करी करणाऱ्या रेती धारकांच्या खबऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी हटविण्याचा प्रयत्न केला. त्यांना हटकले असता, त्यांनी त्यांची दुचाकी जोरात पळवली. त्यामुळे कार्यालयातील एका शिपायाला जखमी झाल्याची घटना घडली. दरम्यान शनिवारी दुपारी १२ वाजता नायब तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टिप्पचालक राजू ज्ञानेश्वर सरगर त्याच्याविरुद्ध पूर्णा पोलीस ठाण्यात अवैधरित्या वाळू उपसा करून तो चोरी करण्याच्या उद्देशाने दीड लाख रुपये दंडासह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टिप्पर चालकास पूर्णा पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
























































