पुण्यात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री केल्याप्रकरणी कारवाई, लाखोंचा माल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहराच्या विविध भागात तंबाखुजन्य पदार्थ, विदेशी सिगारेट, गांजा, दारूची विक्री करणार्‍यासह चढ्या दराने जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणार्‍यांविरुद्ध अंमली व खंडणी विरोधी पथकाने कारवाई करून माल जप्त केला आहे. याप्रकरणी संबंधीतांवर गुन्हा दाखल करून 1 लाख 58 हजारांची सिगारेट जप्त करण्यात आली.

चतुःश्रृंगी येथील आकाश स्टोअर्स या दुकानात सिगारेट व हुक्का फ्लेवर ची विक्री होत आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून नवल नरेंद्र मिश्रा याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सिगारेट व हुक्का फ्लेवर मिळून 1 लाख 58 हजारांचा माल जप्त केला.

येरवड्यात विविध ठिकाणी कारवाई

येरवड्यातही अंमली व खंडणी पदार्थ विरोधी पथकाने जे. एम. अ‍ॅन्ड फास्ट फुड दुकानात प्रतिबंधीत दुकानात तंबाखुजन्य पदार्थ व सिंगारेट विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी  दुकानावर छापा टाकून 2 लाख 25 हजारंचे तंबाखुजन्य पदार्थ व विदेशी सिगारेट जप्त करण्यात आली. याप्रकरणात अमरजीत हरिजीकसिंग संधु याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर येरवडा येथील शिला राज साळवे भाजी मंडई येथे गांजा विक्री करणार्‍या एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 469 ग्रॅम वजानाचा सव्वा आठ हजारांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय राजु चव्हाण याच्यावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महमंदवाडी येथील लक्ष्मीनगर येथे गावठी हातभट्टी दारू विक्रीच्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून 4 हजार 600 रूपयांची गावठी हातभट्टीची दारू जप्त कण्यात आली. त्यानुसार सागर नवनाथ बिनावत याच्यावर वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर कॅम्प यथील सोलापूर बाजार येथे भाग्यलक्ष्मी सुपर मार्केट या दुकानात शेंगदाणे, खोबरे , मुग डाळ चढ्या भावाने विक्री करताना अशोक चुन्नीलाल माली याच्यावर गुन्हा दाखल करणत आला आहे. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीतही न्यु प्रिन्स शॉपी या दुकानात शेंगदाणे चढ्या भावाने विक्री करत असताना  श्रावणकुमार हेमाराज प्रजापती याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.