
एमपीएससीच्या 15 हजार 511 रिक्त पदांची भरती केली जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्रक्ष अजित पवार यांनी केली. मात्र यासंदर्भात प्रशासकीय विभागांकडून मंजूर पदांचे मागणीपत्र लोकसेवा आयोगाला न पाठविल्याच्या गंभीर बाब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी याची गंभीर दखल घेतली असून सर्व विभागांना या पदांचा तत्काळ आढावा घ्या आणि 30 सप्टेंबरपर्यंत लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवा, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.
‘एमपीएससी’कडे अद्याप एकाही विभागाचे मागणीपत्र पोहोचले नाही. त्यामुळे आयोगाकडून कुठल्याही विभागाची पदभरती जाहिरात प्रकाशित झालेली नाही. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात गंभीर दखल घेतली. ‘एमपीएससी’ अंतर्गत येणाऱया पदांबाबत बिंदुनामावली तयार करून व उचित मान्यता घेऊन 30 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे मागणीपत्र पाठवण्याची कार्यवाही प्रशासकीय विभागांनी पूर्ण करावी असे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता तत्काळ कारवाई सुरू होईल आणि एमपपीएससीच्या जागांसंदर्भात जाहिरात निघेल. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या निर्देशांमुळे एमपीएसी परीक्षांना बसणाऱया विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.






























































