
अफगाणिस्तानात आलेल्या मोठय़ा भूकंपामुळे शेकडो लोक इमारतींच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले असून मृत्युमुखींची संख्या आता 1 हजार 400 पर्यंत पोहोचली आहे. रविवारी रात्री अफगाणिस्तानातील जलालाबादजवळ 6.0 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंप रात्रीच्या सुमारास झाल्याने शेकडो लोक झोपेत इमारतीच्या ढिगाऱयाखाली गाडले गेले. भूकंपामुळे प्रचंड हानी झाल्याने अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने विविध देशांकडे मदत मागितली आहे. हिंदुस्थानने काबुलला 1 हजार तंबू पाठवले आहेत. काबुलहून कुनारला 15 टन अन्नपदार्थ पाठवले आहेत. शेकडो इमारतीखाली गाडल्या गेलेल्या नागरिकांना लष्करी जवानांनी ढिगाऱयाखालून
बाहेर काढले.
बोरिवलीत विनामूल्य निसर्गोपचार शिबीर
शिवतेज सामाजिक सेवा संस्थेने बोरिवली पूर्वेकडील शताब्दी हॉस्पिटलसमोरच्या देवेंद्र स्मृती कार्टर रोड नं. 2 येथे विनामूल्य चुंबकीय चिकित्सा आणि निसर्गोपचार शिबिराचे आयोजन केले आहे. हे शिबीर बुधवार, 3 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर 2025 पर्यंत चालणार आहे. संस्थेचे अध्यक्ष व शिवसेना विधानसभा संघटक अशोक सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेनेचे विधानसभा सचिव नरेश विचारे, शाखाप्रमुख दिलीप नागरे, महिला शाखा संघटक स्नेहा कोटकर, शाखा समन्वयक श्रीकांत ढोबळे यांच्या पुढाकाराने हे शिबीर होत आहे. या शिबिरात कंबर, मान, गुडघेदुखी, संधिवात, मूळव्याध, दमा, बीपी, लकवा, डोळे, कान, नाक व घशाच्या विकारांवर उपचार केले जातील. अधिक माहितीसाठी 9930564808 या क्रमांकावर संपर्क साधावा.