जगभरातील महत्त्वाच्या घडामोडी..

सेन्सेक्स, निफ्टीत घसरण; शेअर बाजार कोसळला

शेअर बाजार मंगळवारी धडाम झाला. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 153 अंकांनी तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 25,100 अंकांच्या खाली घसरला. सर्वात जास्त घसरण ऑटो, मेटल आणि फार्मा शेअर्समध्ये दिसली. बीएसई सेन्सेक्स 152 अंकांनी घसरून 81,820 अंकांवर बंद झाला तर एनएसईचा 50 शेअर्सचा इंडेक्स निफ्टी 70 अंकांनी घसरून 25,057 अंकांवर बंद झाला. बीएसईमध्ये लिस्टेड पंपन्यांचे एकूण मार्पेट पॅप आज वाढून 463.87 लाख कोटींवर पोहोचले.

पीडित मुलीशी लग्न केल्यास आरोपीला जामीन

तुरुंगातून सुटल्यानंतर किशोरवयीन पीडित मुलीशी लग्न करावे लागेल. त्या मुलीला समाजात वावरण्यासाठी चांगले आयुष्य द्यावे लागेल. तिच्या नवजात मुलाला आधार देण्याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, अशा अटी घालत प्रयागराज उच्च न्यायालयाने एका बलात्कार प्रकरणात अटक झालेल्या आरोपीला जामीन मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाने न्यायाधीश कृष्णा पहल यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी पार पडली. त्या वेळी न्यायालयाने आरोपीला जामीन मंजूर केला. खंडपीठाने पॉस्को कायद्यांतर्गत दाखल केलेल्या प्रकरणात हा आदेश दिला आहे. उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. फसवणूक करून आणि लग्नाचे खोटे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप बलात्कार पीडित विद्यार्थिनीने केला होता. बलात्कार पीडित मुलगी अवघ्या 15 वर्षाची आहे. आरोपीसोबतच्या शारीरिक संबंधांमुळे मुलगी गरोदर राहिली. ही घटना उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला, मात्र त्यांनी लग्न करण्यास नकार दिला. उलट मुलीच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर मुलीच्या वडिलांनी थेट पोलीस स्टेशन गाठत आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

पुण्यात बनवणार अॅपलचे एअरपॉड्स

तामीळनाडूमध्ये आयपह्न तयार केला जात आहे. यानंतर आता पुण्यात अॅपलचे एअरपॉड्स तयार केले जाणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. एअरपॉड्सचे प्रोडक्ट्स पुढील वर्षापासून सुरू होईल. पुण्यात एअरपॉड्स बनवण्यात आल्यानंतर पुण्यातून ते हिंदुस्थानात विक्रीसाठी उपलब्ध असेल. तसेच या एअरपॉड्सला विदेशात निर्यात केले जाणार आहेत. अॅपल पंपनी सर्वात आधी अमेरिकन पंत्राट उत्पादक जेबीएलच्या पुण्यातील कारखान्यात एअरपॉड्स केसिंगचे प्रोडक्ट तयार करणार असून त्यानंतर तेलंगणामधील पह्क्सकॉनच्या नवीन युनिटमध्ये एअरपॉड्सचे उत्पादन सुरू करणार आहे. 2021 मध्ये अॅपलने हिंदुस्थानात आयपह्न बनवण्यास सुरुवात केली.

जिओचे दोन स्वस्त पह्न लाँच

रिलायन्स जिओने जिओ भारत सीरिज अंतर्गत दोन नवीन पह्न जिओ भारत व्ही 3 आणि जिओ भारत व्ही 4 हे दोन पह्न इंडिया मोबाईल काँग्रेस 2024 मध्ये लाँच केले. या फीचर पह्नची किंमत फक्त 1099 रुपये आहे. या पह्नमध्ये 1000 एमएएच क्षमतेची बॅटरी दिली आहे. 128 जीबीपर्यंत स्टोरेज वाढवण्याची सुविधा आहे. पह्नमध्ये 23 भारतीय भाषेचा सपोर्ट मिळतो. पह्नमध्ये मेसेजिंग, पह्टो शेअरिंग आणि ग्रुप चॅटिंगची सुविधा देण्यात आली आहे.

किंग’साठी सुहानाची मेहनत

अभिनेता शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आगामी ‘किंग’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटासाठी ती कठोर मेहनत करताना दिसत आहे. सध्या तिचा जीममधील वर्कआऊट करतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. तिची ही कठोर मेहनत पाहून चाहत्यांनीही भरभरून कमेंट केल्या आहेत. ‘किंग’ हा चित्रपट 2026 ला ईदला प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात शाहरुख खान, अभिषेक बच्चन, अभय वर्मा यांच्या भूमिका आहेत.

आरएसएसवर कॅनडात बंदीची मागणी

कॅनडातील न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुखांनी कॅनडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. न्यू डेमोक्रॅटिक पार्टीचे प्रमुख जगमीत सिंग यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. निज्जर हत्याप्रकरणी रॉयल कॅनेडियन माऊंटेड पोलिसांनी जी माहिती दिली ती धक्कादायक आहे. त्यामुळे न्यू डेमोक्रॅटिक पार्टीत चिंतेचे वातावरण आहे. या प्रकरणामुळे कॅनडातील शीख समूदायातही भीतीचे वातावरण आहे, असे त्यांनी म्हटले आहे. निज्जर हत्येत मोदी सरकारच्या अधिकाऱ्यांचा हात असल्याचा आरोप कॅनडाने केला असून त्याचे पुरावेही आमच्याकडे आहेत, परंतु याप्रकरणी अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, हे दुर्दैवी आहे. आम्ही कॅनडातील प्रत्येक नेत्याला विनंती करतो, त्यांनी या कृत्यासाठी मोदी सरकारला जाब विचारावा. कॅनडाच्या नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करणे, ही न्यू डेमोक्रॅटिक पार्टीची प्राथमिकता आहे असेही जगमीत सिंग यांनी म्हटले आहे.