इमरान खान यांचे तुरुंगात हाल

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांची कारागृहातील अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना औषधोपचार दिले जात नाहीत, जेवण दिले जात नाही. तसेच त्यांना कारागृहात एकटे ठेवले जाते, असा दावा करत इमरान यांच्या वकिलांनी ही बाब संयुक्त राष्ट्राच्या निदर्शनास आणून दिली आहे.

मानवाधिकाराचे उल्लंघन होत आहे, इमरान यांच्यावर अन्याय होत आहे. त्यामुळे वकिलांनी संयुक्त राष्ट्राकडे याप्रकरणी अपील दाखल करत दाद मागितली आहे. खान यांच्या वतीने पर्सियस स्ट्रटेजिजने हे अपील सादर करताना म्हटले आहे की, दीर्घकाळ एकांतवास, वैद्यकीय सेवा नाकारणे, दूषित अन्न व कायदेशीर सल्ला, कुटुंबीयांच्या भेटीसाठी कमी वेळ देणे अशा पद्धतीने इमरान खान यांचा छळ केला जात आहे.