
सामना ऑनलाईन । इस्लामाबाद
हिंदुस्थानी विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने हिंदुस्थानकडे सोपवल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान यांना ‘नोबेल शांती पुरस्कार’ देण्याची मागणी पाकिस्तानात पुढे आली आहे. मात्र खुद्द इम्रान खान यांनी आपण त्या पुरस्कारासाठी मुळीच पात्र नाही, असे सांगतानाच ‘नोबेल शांती पुरस्कार’ हा कश्मीर समस्येवर तोडगा काढणाऱया व्यक्तीला दिला गेला पाहिजे, असे म्हटले आहे.
इराणची पाकिस्तानात घुसून कारवाईची धमकी
नवी दिल्ली – इराणनेही पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठीशी घालत असून त्यांच्याविरोधात कुठल्याही कारवाया करत नाही. त्यामुळे अखेर इराणने दहशतवादाच्या विरोधात पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.



























































