
पुणे ते बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कळसे हद्दीत दुचाकीच्या झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. रोहित प्रकाश गेंडे (कय 27, रा. गांधी चौक, मिरज, जि. सांगली) असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रोहित प्रकाश गेंडे हा सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास साताऱयाकडून कऱहाडकडे जाणाऱया मार्गिकेकरून दुचाकी (एमएच 10 डीके 2666) घेऊन केगाने प्रवास करीत होता. त्यावेळी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या पुढे कळसे येथील सूतगिरणीसमोरून जात असताना दुचाकीवरील त्याचा ताबा सुटला. यामुळे राष्ट्रीय महामार्गाकरील दुभाजकास जोराने धडकल्याने दुचाकी पलटी झाली. यामध्ये त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्यामुळे कराडकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. यामुळे लांबच लांब रांगा लागल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलीस ठाण्याचे अपघात विभागाचे विजय देसाई, संजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह नागठाणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शकविच्छेदनास पाठविला. तसेच राष्ट्रीय महामार्गाकरील वाहतूक सुरळीत करून दिली.


























































