
धारावी व कुर्ला विभागातील शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीचे उमेदवार व कार्यकर्त्यांशी आज शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी संवाद साधला. आदित्य ठाकरे यांच्या शाखाभेटी आणि संवादप्रसंगी मतदारांनी शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीला जोरदार पाठिंबा दिला.
कुर्ला येथील शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग क्रमांक १६९ मधील उमेदवार शिवसेनेच्या प्रवीणा मोरजकर यांच्या कार्यालयाला आदित्य ठाकरे यांनी भेट देऊन कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. तसेच धारावी येथील वॉर्ड क्रमांक १८५ मधील युतीचे उमेदवार शिवसेनेचे टी. एम. जगदीश यांच्या निवडणूक कार्यालयालाही त्यांनी भेट दिली.
याशिवाय धारावी प्रभाग क्रमांक १८८ मधील युतीचे उमेदवार आरीफ शेख यांच्या कार्यालयाला भेट देत आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्ते व मतदारांशी संवाद साधला. यावेळी मतदारांनी आपण शिवसेना–मनसे–राष्ट्रवादी युतीच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.


































































