लातूरमध्ये बनावट कागदपत्राआधारे प्लॉट नावावर करून घेतला; चौघांविरुध्द गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लातूर येथील युवा भिमसेना संघटना अध्यक्ष पंकज संभाजी काटे याच्यासह चारजणांविरुध्द बनावट कागदपत्रे तयार करून प्लॉट नावावर करून घेतल्याप्रकरणी पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

कळंब तालुक्यात राहणाऱ्या तक्रारदारांनी 16 जुलै 2022 रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पंकज संभाजी काटे (युवा भिमसेना अध्यक्ष, रा. अवंती नगर लातूर), मल्लीकार्जुन चन्नाप्पा शेटे (रा. आमलेश्वर नगर लातूर), अनिस नुरखा पठाण (रा. पेठ ता. लातूर), जब्बार सत्तार सय्यद (रा. बोडका, ता. लातूर) यांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. तक्रारदाराच्या आईने 1989 साली मृत चन्नाप्पा तुकाप्पा शेटे यांच्याकडून खाडगाव परिसरातील खुला प्लॉट विकत घेतला होता.

20210 रोजी आरोपींनी संगनमत करून प्लॉटच्या कागदपत्रांवर खाडाखोड करून बनावट सत्यप्रती तयार करून ते मूळ दस्तऐवजाला जोडून गुन्ह्यातील मल्लीकार्जुन चन्नाप्पा शेटे याच्याकडून पंकज संभाजी काटे यांनी खरेदी केला. खोटे कागदपत्र व मूळ कागदपत्रात खाडाखोड करून परस्पर जमिनीची विक्री खरेदी व्यवहार करून तक्रारदाराची फसवणूक केली. या प्रकरणी पोलीस ठाणे एमआयडीसी येथे आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनात व पोलीस ठाणे एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड हे करीत आहेत.