वडीलच करतात आपल्या मुलीशी लग्न! जाणून घ्या विचित्र प्रथेबाबत

देश तसा वेश अशी अशी म्हण आहे. त्याचप्रमाणे देशाप्रमाणे रुढी परंपराही बदलत जातात. मात्र, जगातील काही समुदायांमध्ये विचित्र आणि अनोख्या रुढी परंपरा आहेत. ज्यावर आपला विश्वासही बसत नाही. अशीच एक विचित्र प्रथा बागंलादेशमध्ये पाळली जाते. येथील काही समुदायात वडिलच आपल्या मुलीशी लग्न करतात. विशेष म्हणजे मुलगी आणि आई एकाच घरात एकाच नवऱ्यासोबत सुखाने संसार करतात. ही प्रथा आजही त्या जमातीत पाळली जाते.

बांगलादेशातील मंडी जमातीच्या लोकांमध्ये ही प्रथा आढळते.या जातीत जर तरुण वयात स्त्री विधवा झाली तर पुरुष तिच्याशी पुनर्विवाह करतो. पण जर त्या स्त्रीला पहिल्या लग्नापासून मुलगी असेल तर तो ही मुलगी वयात येताच तिच्यासोबतही लग्न करतो. याच अटीवर तो त्या विधवा महिलेशी लग्न करण्यास तयार होतो. सावत्र पिता केवळ आपल्या सावत्र मुलीचा पती बनत नाही तर तो तिच्याशी शारीरिक संबंध देखील ठेवू शकतो. या प्रथेवर अनेक प्रश्न उपस्थित होत असून त्यावर टीकाही होत आहे.

मंडी जमातीतील लोक या विचित्र प्रथाचे अनेक शतकांपासून पालन करत आहेत. आधी विधवा आई आणि नंतर तिची मुलगी अशा दोघींनाही त्या पुरुषाला सांभाळावे लागते. परंतु या विचित्र प्रथेमुळे आजवर अनेकांची घरे व अनेक मुलींची आयुष्य उद्ध्वस्त झाली आहेत. मंडी जमातीतील ओरोला नावाच्या मुलीने या दुष्ट प्रथेचा खुलासा केला होता. ओरोलाने सांगितले की, ती लहान असतानाच तिचे वडील वारले. त्यामुळे तिच्या आईने दुसरं लग्न केलं. आईच्या लग्नानंतर तिच्या नवऱ्याला अरोला वडील मानायची मात्र आता तिने त्यांना तिच्या नवऱ्याच स्थान दिलं आहे.

विधवा स्त्री आणि तिची मुलगी समाजाच्या नजरेपासून सुरक्षित राहवी, त्यांच्यावर कोणाची वाईट नजर पडू नये, या हेतूने अनेक शतकांपूर्वी ही प्रथा अस्तित्त्वात आल्याची माहिती मिळत आहे. मात्र, आजच्या काळात ही प्रथा कितपत योग्य आहे, असा प्रश्न उपस्तित होतो. मात्र, जगापासून दूर असलेल्या अनेक समुदाय त्यांच्या प्रथापरंपराचे पालन करत आहेत.