
हिंदुस्थानने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी म्हणून अमेरिकडून दबाव टाकण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यातच हिंदुस्थान दौऱ्यावर असलेले रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आज मोठे वक्तव्य केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन यांनी आज संयुक्त निवेदन जारी केले. यात व्लादिमीर पुतिन म्हणाले की, “हिंदुस्थानला तेल पुरवठा सुरूच राहील.”
रशियन राष्ट्राध्यक्षांच्या या विधानामुळे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नाराज होण्याची शक्यता आहे, जे हिंदुस्थानला रशियन तेल खरेदी थांबवण्याचे आवाहन करत आहेत. ट्रम्प यांनी रशियाचे तेल खरेदी केल्याबद्दल हिंदुस्थानवर अतिरिक्त २५ टक्के (एकूण ५०%) टॅरिफ लादले आहे.
व्लादिमीर पुतीन म्हणाले आहेत की, “रशिया हा तेल, वायू, कोळसा आणि हिंदुस्थानच्या ऊर्जा विकासासाठी आवश्यक असलेल्या इतर सर्व गोष्टींचा विश्वासार्ह पुरवठादार आहे. वेगाने वाढणाऱ्या हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला तेलाची निर्यात सुरू ठेवण्यास आम्ही तयार आहोत.”


























































