वाईमध्ये कासव तस्करांना रंगेहाथ पकडले वन विभागाची कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

वाई तालुक्यातील वेळे येथील एका हॉटेलजवळ काही इसम कासवविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानुसार वन विभागाने हॉटेल परिसरात सापळा रचून कासव तस्करांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व कासव जप्त करण्यात आले आहे.

 प्रथमेश यादव (रा. खंडाळा) व अशोक कदम (रा. सातारा) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

 वाई तालुक्यातील वेळे येथे कासव तस्कर येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली. त्यानुसार वन विभागाने सापळा लावून ही कारवाई केली. संशयितांनी हे कासव विक्रीसाठी आणल्याचे कबूल केले आहे. साताऱयातील एका व्यक्तीने हे कासव दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. संशयितांवर वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, कासव आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे.

 सातारा जिल्हा उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली वाई तालुका वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्नेहल मगर, वनपाल दिलीप व्हनमाने, वनरक्षक संजय आडे, हरिबा शिंदे, बाबू मराडे, सु. रा. गभाले यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.