इन्कमटॅक्सची 45 कंपन्यांना नोटीस

आयकर विभाग (इन्कम टॅक्स) ने 45 कंपन्यांना करचोरी केल्याप्रकरणी नोटीस पाठवली आहे. ज्या कंपन्यांना नोटीस पाठवली आहे. त्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून वस्तूंची विक्री करीत होत्या. सध्या 45 कंपन्यांना नोटीस पाठवली असून 10 हजार कोटी रुपयांची करचोरी आढळल्याने यापुढे आणखी काही कंपन्यांना नोटीस पाठवली जाईल, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

मोठय़ा ई-कॉमर्स कंपन्यांव्यतिरिक्त, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवरील स्टोअर्सवर आयकर विभागाने बारकाईने लक्ष ठेवले आहे. 45 पैकी 17 कंपन्या कपडे विकणाऱ्या आहेत. 11 दागिने विकणाऱ्या कंपन्या आहेत. शूज आणि पिशव्या विकणाऱ्या सहा कंपन्या आहेत.