निमलष्करी दलाला रेशन, हार्डशिप अलाऊन्समध्ये आयकर सूट 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

निमलष्कर दलाच्या जवानांना रेशन आणि हार्डशिप अलाऊन्सवर आयकरात सूट मिळणार आहे. याचा फायदा सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयसीएफ, आयटीबीपी आणि एसएसबी या निमलष्कर दलांच्या जवानांना होणार आहे. केंद्रीय गृह खात्याने अर्थ मंत्रालयाला अशी सूट मिळावी, अशी शिफारस केली होती. ही शिफारस मान्य करण्यात आली आहे. या केंद्रीय अंदाजपत्रकापासून ही सूट मिळणार आहे. लष्कर, आसाम रायफल्स आणि एसएसजीच्या जवानांना मोफत रेशन मिळते. मात्र, सीआरपीएफ, बीएसएफ, सीआयएसएफ, आयटीबीपी आणि एसएसबीला रेशन खरेदी करण्यासाठी वेगळा भत्ता दिला जातो.