ध्यान करणे ते शांत झोप, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आयुष्यात करा 10 छोटे बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वाढते वय आणि व्यस्त जीवनशैलीमुळे स्मरणशक्ती कमी होणे एक सामान्य समस्या बनली आहे. मात्र यामुळे अनेकदा खूप त्रास सहन करावा लागू शकतो. तुम्हालाही असा विसरण्याचा त्रास होत असेल तर तुमच्या आयुष्यात हे बदल नक्की करा. स्मरणशक्ती कमी होण्यामागे विशेषत: अल्झायमर रोगामध्ये जीन्सची मोठी भूमिका असते. परंतु संशोधनात असे आढळले की, योग्य आहार आणि निरोगी जीवनशैलीच्या मदतीने स्मरणशक्ती कमी होण्यापासून वाचवता येते.

साखर कमी करा –
साखरेचे अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक असल्याचे वेळोवेळी संशोधनातून सिद्ध झाले आहे. रोज साखर खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. म्हणून साखर कमी करणे हा निरोगी आयुष्याचा एकमेव मार्ग आहे. रोज साखर खाल्ल्याने स्मरणशक्ती कमी होते आणि मेंदूवरही वाईट परिणाम होतो. म्हणून साखर कमी करणे हा निरोगी आयुष्याचा मार्ग आहे.

फिश ऑइल सप्लिमेंट्स घ्या –
फिश ऑइलमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते जे स्मरणशक्ती सुधारते. रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि जास्त साखर रक्तातील साखरेवर परिणाम करते, ज्यामुळे कधीकधी मेंदूचे नुकसान होते.

ध्यान करा –
ध्यान केल्याने तुमचे शरीर केवळ निरोगी बनत नाही तर तुमचा मेंदूही तणावमुक्त होतो, ज्यामुळे स्मरणशक्ती चांगली राहते.

पुरेशी झोप घ्या –
संशोधनात असे आढळले आहे की, चांगल्या झोपेचा तुमच्या स्मरणशक्तीवर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे पुरेशी आणि शांत झोप घ्या.

वजन नियंत्रित ठेवा –
योग्य बीएमआयचा तुमच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम होतो. त्यामुळे चांगल्या स्मरणशक्ती आणि मानसिक आरोग्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा

अल्कोहोल कमी प्या – अल्कोहोल स्मरणशक्तीसाठी हानिकारक आहे. अल्कोहोलमध्ये असलेले न्यूरोटॉक्सिक प्रभाव मेंदूचा भाग निष्क्रिय करण्यास सुरवात करतो जो स्मरणशक्ती वाढविण्याचे काम करतो.

मेंदूचे खेळ खेळा –
मेंदूचे खेळ एखाद्याचा मेंदू सक्रिय करण्याचा एक चांगला मार्ग आहे. याच्या मदतीने डिमेंशियाच्या समस्येवरही नियंत्रण ठेवता येते.

व्हिटॅमिन डी – तुमची व्हिटॅमिन डी पातळी तपासा. व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी झाल्यामुळेही स्मरणशक्ती कमी होते. त्यामुळे काही काळ सूर्यप्रकाशातही फिरा.

आहारात कोकोचा समावेश करा –
अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असलेल्या कोकोचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती मजबूत होते. त्यामुळे आहारात मर्यादित प्रमाणात याचा समावेश नक्की करा.