न्यूझीलंड विरुद्ध मालिकाविजयानंतर विराटने इंस्टाग्रामवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल

1238

न्यूझीलंड विरुद्धच्या ऐतिहासिक टी-20 मालिका विजयनानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. लाईफ इज ब्लेसिंग (जीवन हा निसर्गाने आपल्याला दिलेला एक आशीर्वादच आहे) अशी निखळ आनंद व्यक्त करणारे पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर विराटने शेअर केली आहे. सोबत आपला आनंदी फोटोही त्याने शेअर केला आहे.

आपल्या धडाकेबाज खेळणे क्रिकेट शौकिनांच्या हृदय सिंहासनावर विराजमान झालेल्या कर्णधार विराटने आपल्या कारकिर्दीतील यशाचा निखळ आनंद सतत सोशल मीडियावर चाहत्यांसाठी शेअर केलाय.मैदानावर प्रतिस्पर्धी खेळाडूंवर आपल्या खेळाने बरसणारा विराट मैदानाबाहेर मात्र अतिशय भावुक झालेला दिसतो.मंगळवारी त्याने आपला फिटनेस वर्कआऊटचा आगळा फोटो टाकून चाहत्यांना चकित केले होते.


View this post on Instagram

Life is a blessing.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

यशच विराटच्या प्रेमात पडलेय
कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळतांना सकारात्मक दृष्टीकोन बाळगून टीम इंडियासाठी शतप्रतिशत योगदान देणाऱ्या विराट कोहलीच्या प्रेमात यशही आकंठ बुडालेले दिसतेय.त्यामुळेच विराटने माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागे टाकत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धाव नोंदवणारा फलंदाज म्हणून विक्रम रचला आहे. धोनीने टी-20 त 1112 धावा फटकावल्या आहेत.विराट त्याच्या पुढे गेला आहे. शिवाय टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत सर्वाधिक अर्धशतके आणि सर्वाधिक धावा नोंदवणारा तो जगातला नंबर वन खेळाडू बनला आहे. त्याच्यापाठोपाठ रोहित शर्मा दुसऱ्या स्थानी आहे.

आपली प्रतिक्रिया द्या