#INDvWI रोहितचे खणखणीत दीडशतक, विशाखापट्टणममध्ये विक्रमांचा पाऊस

5746

विशाखापट्टण येथे वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय लढतीत टीम इंडियाचा हिटमॅन रोहित शर्माने दणदणीत शतक झळकावले. रोहितचे कारकीर्दीतील हे 28 वे शतक होते. बाद होण्यापूर्वी रोहित शर्माने 139 चेंडूत 159 धावांची दीडशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान रोहितने अनेक विक्रमांना गवसणी घातली.

28 वे शतक
रोहित शर्माचे एक दिवसीय क्रिकेटमधील हे 28 वे शतक ठरले. एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक करण्याबाबत त्याने श्रीलंकेचा माजी कर्णधार सनथ जयसूर्याशी बरोबरी केली. तर दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम आमला याला मागे टाकले.

#INDvWI सचिननंतर असा विक्रम करणारा रोहित क्रिकेट विश्वातील दुसराच खेळाडू

सर्वाधिक षटकार
159 धावांच्या खेळीदरम्यान रोहितने 5 षटकार ठोकले. यासह एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्या नावावर जमा झाला आहे. त्याने 2019 मध्ये 77 षटकार ठोकले आहेत. याआधीचा सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम रोहितच्याच नावावरच होता. त्याने 2018 मध्ये 74 आणि 2017 मध्ये 65 षटकार मारले होते.

गांगुली-वॉर्नरशी बरोबरी
रोहित शर्माचे हे 2019 मधील एक दिवसीय क्रिकेटमधील 7 वे शतक होते. एका वर्षात सर्वाधिक शतक करण्याबाबत रोहितने डेव्हिड वॉर्नर आणि सौरव गांगुलीशी बरोबरी केली. वॉर्नरने 2016 तर गांगुलीने 20000 मध्ये एका वर्षात 7 शतक झळकावले होते. या क्रमवारीत सचिन पहिल्या स्थानावर असून त्याने 1998 मध्ये एका वर्षात 9 शतके केली होती.

सर्वाधिक धावा
शतकी खेळीसह रोहितने 2019 या वर्षामध्ये एक दिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा ठोकण्याचा मान पटकावला आहे. या यादीत सध्या रोहित पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. रोहितने कर्णधार कर्णधार विराट कोहलीला मागे टाकले.

टीम इंडियाकडून वैयक्तीक सर्वोच्च स्कोर
रोहित शर्मा 2013 पासून प्रत्येक वर्षात एक दिवसीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून सर्वोच्च धावा केल्या आहेत. 2013 मध्ये 209, 2014 मध्ये 264, 2015 मध्ये 150), 2016 मध्ये नाबाद 171, 2017 मध्ये नाबाद 208, 2018 मध्ये 162 आणि 2019 मध्ये 159 धावा चोपल्यात.

आपली प्रतिक्रिया द्या