#INDvWI धोनी, पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची विराटला संधी

410
2) विराट कोहली - 119 डाव

गुरुवारपासून टीम इंडिया आणि वेस्ट इंडीज संघात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना सुरू होत आहे. या कसोटी मालिकेमध्ये टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. या कसोटी मालिकेत विराटला माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्याची संधी आहे.

विराट कोहलीला आगामी कसोटी मालिकेत दोन विक्रम खुणावत आहेत. रिकी पाँटिंगने कसोटीत नेतृत्व करीत असताना 19 शतके झळकावली आहेत. विराट कोहलीने नेतृत्वात आतापर्यंत 18 कसोटी शतके साजरी केली असून रिकी पाँटिंगच्या विक्रमाची बरोबरी करण्यासाठी त्याला एका शतकाची गरज आहे. कसोटीत नेतृत्व करीत असताना सर्वाधिक शतकांचा विक्रम ग्रॅमी स्मिथच्या नावावर आहे. त्याने 25 शतके झळकावली आहेत.

पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यास विराट कोहलीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने सर्वाधिक 27 लढती जिंकल्या आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थानने आतापर्यंत 26 लढती जिंकल्या आहेत. त्यामुळे पहिल्या कसोटीत विजय मिळवल्यास विराट कोहलीला महेंद्रसिंग धोनीच्या विक्रमाची बरोबरी करता येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या