IND VS ENG TEST LIVE – हिंदुस्थान विजयपथावर, विजयासाठी एका विकेट्सची आवश्यकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नॉटिंगहम

नॉटिंगहम येथे सुरू असलेली तिसरी कसोटी जिंकण्यासाठी टीम इंडियाला आणखी एका विकेट्सची आवश्यकता आहे. चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने 9 बाद  311 धावा केल्या आहेत. खेळ संपला तेव्हा रशिद 30 आणि अँडरसन 8 धावांवर खेळत होता. सामन्याचा उद्या (बुधवार) पाचवा दिवस असल्याने हिंदुस्थानला विजयाची सुवर्णसंधी आहे. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराहने 4, इशांत शर्माने 2, तर हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमीने प्रत्येकी एक बळी घेतला.

लाईव्ह अपडेट

  • हिंदुस्थान विजयपथावर, विजयासाठी एका विकेट्सची आवश्यकता
  • चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडच्या 9 बाद 311 धावा

  • इंग्लंडच्या 300 धावा पूर्ण

  • बुमराहने घेतला पाचवा बळी
  • इंग्लंडला नववा धक्का, ब्रॉड 20 धावांवर बाद

  • इंग्लंडच्या 250 धावा पूर्ण

  • बुमराहच्या गोलंदाजीवर रशिद बाद, पण नो बॉल असल्याने पंचांनी ठरवले नाबाद
  • हिंदुस्थानला विजयासाठी आणखी 2 विकेट्सची आवश्यकता
  • हार्दिक पांड्याने घेतला बळी
  • इंग्लंडला आठवा धक्का, स्टोक्स 62 धावांवर बाद

  • इंग्लंडला सातवा धक्का, वोक्स चार धावांवर माघारी

  • बुमराहने सलग दोन चेंडूवर घेतले दोन बळी

  • इंग्लंडला सहावा धक्का, बेअरस्टो शुन्यावर बाद

  • बटलर 106 धावांवर बाद, बुमराहने घेतला बळी
  • इंग्लंडचा पाचवा धक्का

  • बटलरचे शतक, इंग्लंडचा डाव सावरला

  • इंग्लंडच्या 200 धावा पूर्ण
  • चहापानापर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 173 धावा, विजयासाठी 348 धावांची आवश्यकता

  • बटलरचे अर्धशतक पूर्ण

  • स्टोक्स आणि बटलरची जोडी जमली, हिंदुस्थानला विकेट्सची आवश्यकता
  • इंग्लंडच्या 150 धावा पूर्ण

  • इंग्लंडच्या 100 धावा पूर्ण

  • हिंदुस्थानला विजयासाठी आणखी सहा विकेट्सची आवश्यकता
  • बटलर (19) आणि स्टोक्स (3) मैदानात
  • चौथ्या दिवशी लंचपर्यंत इंग्लंडच्या 4 बाद 84 धावा

  • शमीने केले पोपला 16 धावांवर बाद
  • इंग्लंडला चौथा धक्का, पोप बाद

  • बुमराहने रुटला केले 13 धावांवर बाद
  • इंग्लंडला तिसरा धक्का, जो रूट बाद

  • कर्णधार जो रूट आणि ओली पोप मैदानात
  • इशांत शर्माने घेतला दुसरा बळी
  • इंग्लंडला दुसरा धक्का, कुक 17 धावांवर बाद

  • इशांत शर्माने जेनिंगला 13 धावांवर बाद केले
  • इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंग बाद

  • कुक आणि जेनिंग मैदानात
  • चौथ्या दिवसाचा खेळ सुरू