IND vs ENG 3rd Test – सामना निर्णायक वळणावर! टीम इंडियाला जिंकण्यासाठी 135 धावांची आणि इंग्लंडला 6 विकेटची गरज

Photo - BCCI

लॉर्ड्सच्या मैदानावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत विजयी आघाडी कोण घेणार याचे चित्र चौथ्या दिवशीही स्पष्ट झालेलं नाही. टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत इंग्लंडचा दुसरा डाव 192 धावांवर संपूष्टात आणला. त्यामुळे टीम इंडियाला जिंकण्यासाठी 193 धावांची गरज आहे. मात्र आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली. जोफ्रा आर्चरने यशस्वी जयवालला भोपळाही फोडू न देता आल्यापावली माघारी पाठवले. त्यानंतर करुण नायर (14), शुभमन गिल (6) आणि आकाश दीप (1) झटपट माघारी परतल्यामुळे दिवसा अखेर टीम इंडियाची अवस्था 58 धावांवर चार विकेट अशी झाली आहे. त्यामुळे टीम इंडियाला आता जिंकण्यासाठी 135 धावांची गरज आहे तर, इंग्लंडला जिंकण्यासाठी 6 विकेटची गरज आहे.