किवीजच्या फलंदाजांनी घेतलाय यॉर्करतज्ञ बुमराहचा धसका, गप्टिल म्हणतो…

हिंदुस्थानचा यॉर्करतज्ञ आणि चतुर वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा न्यूझीलंडच्या स्टार फलंदाजांनीही धसका घेतला आहे. बुमराह चेंडू मधेच मंद वेगाने टाकण्यासोबतच बाउन्सर मारण्यातही माहीर आहे. त्याच्या अचूक टप्प्यावरील चेंडूंवर जोरदार फटके मारणे धडाकेबाज किवीजच्या फलंदाजांनाही धोक्याचे वाटत आहे. त्यामुळे यजमान संघाच्या स्टार फलंदाजांनी जागतिक नंबर वन गोलंदाज बुमराहच्या गोलंदाजीचा धसका घेतला आहे.

हिंदुस्थानचा संघ टी-20 क्रिकेटमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, वाचा सर्व आकडेवारी

कर्णधार विराट कोहलीच्या टीम इंडियाने पहिल्या दोन टी-20 लढतीत अगदी नियोजनबद्ध खेळ करीत न्यूझीलंड संघाला चारी मुंड्या चीत केले आहे. त्यामुळे यापुढच्या तीन टी-20 मध्ये तरी बुमराहची गोलंदाजीत लय बिघाड अशी प्रार्थना यजमान संघाचा धडाकेबाज सलामीवीर मार्टिन गप्टिलने केली आहे.

राहुलचा ऐतिहासिक पराक्रम, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला यष्टीरक्षक फलंदाज

जसप्रीत बुमराह अखेरच्या षटकांतला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे धीम्या गतीने चेंडू टाकण्याची आणि बाऊन्सर टाकण्याची क्षमताही आहे. त्यामुळे तुम्ही बुमराहला टाळू शकत नाही. आम्ही एवढीच आशा करु शकतो की पुढील 3 सामने बुमराहसाठी वाईट ठरतील, अशी प्रार्थना मार्टिन गप्टिल याने केली आहे.

धावांचा पाठलाग करण्याचे तंत्र कर्णधार विराटकडून शिकलो, धडाकेबाज अय्यरची कबुली

आपली प्रतिक्रिया द्या