IND vs SA 2nd T20 – सूर्यानं डोकं लावलं अन् टॉस जिंकला! संजू पुन्हा बाकावर, कमबॅकसाठी आफ्रिकेनं केले तीन बदल

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात पाच टी-20 सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना न्यू चंदीगड येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवण्यात येत आहे. या लढतीत हिंदुस्थानचा कर्णधार सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

पहिल्या लढतीत विजय मिळवत मालिकेत 1-0 आघाडी घेणाऱ्या हिंदुस्थानने संघात कोणताही बदल केलेला नाही. संजू सॅमसन दुसऱ्या लढतीतही बाकावर आहे. तर दुसरीकडे मालिकेत पिछाडीवर असलेला दक्षिण आफ्रिकेचा संघ तीन बदलांसह मैदानात उतरला आहे.

पहिल्या टी-20 लढतीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकला होता. या लढतीत त्याने केएल राहुल याची कॉपी करत डाव्या हाताने नाणे उंच फेकले होते, पण नाणेफेक जिंकण्यात त्याला अपयश आले होते. त्यामुळे दुसऱ्या लढतीत नाणेफेक जिंकण्यासाठी सूर्यकुमार यादव याने शक्कल लढवली. त्याने यावेळी उजव्या हाताने नाणे अधिक उंच भिरकावले आणि नाणेफेकीचा कौल जिंकला.

हिंदुस्थानचा संघ –

अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार) , तिलक वर्मा, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.

दक्षिण आफ्रिकेचा संघ –

रीझा हेंड्रिक्स, क्विंटन डी कॉक, एडन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, जॉर्ज लिंडे, मार्को जॅनसेन, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ओटनील बार्टमन.

21 व्या लढतीत नाणेफेक जिंकला होता

दरम्यान, सलग 20 वन डे लढतींमध्ये नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर केएल राहुल याने 21 व्या लढतीत हा दुष्काळ संपवला होता. 6 डिसेंबरला विशाखापट्टणम येथे झालेल्या तिसऱ्या आणि अंतिम वन डे लढतीत केएल राहुल याने नेहमीप्रमाणे उजव्या नाही तर डाव्या हाताने नाणे भिरकावले होते. त्याचा हा डाव यशस्वी ठरला होता आणि हिंदुस्थानने नाणेफेकीचा कौल जिंकला. यानंतर राहुलच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता.