
केपटाऊनमध्ये हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिका संघात तिसरी टेस्ट सुरू आहे. हिंदुस्थानने चार विकेट्स गमावल्या असून कॅप्टन विराट कोहली मैदानात उभा आहे. विराटने आपल्या खेळीदरम्यान एक माइलस्टोन गाठला.
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा आज 49 वा वाढदिवस आहे. द्रविडच्या वाढदिवशीच विराटने कोचला एक खास गिफ्ट दिले आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत विराटने द्रविडला मागे सोडले आहे.
केपटाऊन कसोटीमध्ये विराटने 14 वी धाव घेताच त्याने राहुल द्रविडला मागे सोडले. राहुल द्रविडने दक्षिण आफ्रिकेत 29.70 च्या सरासरीने 611 धावा केल्या आहेत. विराटने द्रविडला ओव्हरटेक केले आहे.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या हिंदुस्थानी खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकरचे नाव आघाडीवर आहे. सचिनने 46.40 च्या सरासरीने 1161 धावा केल्या आहेत. विराटकडे सचिनचा विक्रम मोडण्याची सध्या तरी संधी नसली तरी दक्षिण आफ्रिकेत कसोटीमध्ये 50 हून सरासरी विराटच्या नावापुढे आहे. आफ्रिकेत त्याने 2 शतक आणि 2 अर्धशतक ठोकलेले आहेत.
IND vs SA टीम इंडियाच्या गोटात कोरोनाचा शिरकाव, अष्टपैलू खेळाडूला झाली लागण
दक्षिण आफ्रिकेत कसोटीसह एक दिवसीय क्रिकेटमध्येही विराटने मजबूत धावा केल्या आहेत. येथे खेळलेल्या 13 डावात त्याने 86.88 च्या सरासरीने 782 धावा केल्या आहेत. यात 3 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचा हाच फॉर्म आगामी एक दिवसीय मालिकेत दिसावा अशी क्रीडाचाहत्यांची इच्छा आहे.





























































