द्रविडचा कानमंत्र आणि दिपक चहरने सामना दिला जिंकून, जाणून घ्या काय होता ‘तो’ मेसेज

हिंदुस्थान आणि श्रीलंका संघातील तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी रंगला. अत्यंत रोमहर्षक झालेला हा सामना टीम इंडियाने 3 विकेट्सने जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. या लढतीत दिपक चहर याने गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकदार कामगिरी केली आणि संघाला विजय मिळवून दिला.

श्रीलंकेने टीम इंडियाला विजयासाठी 276 धावांचे आव्हान दिले होते. टीम इंडियाचे आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. एकवेळ टीम इंडियाच्या 7 बाद 193 धावा झाल्या होत्या आणि दिपक चहर व भुवनेश्वर कुमार ही जोडी मैदानात होती, त्यामुळे हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा जवळपास माळवल्या होत्या. परंतु दिपक चहर (नाबाद 69) आणि भुवनेश्वर कुमार (नाबाद 19) यांनी निर्णायक भागिदारी करत संघाला विजय मिळवून दिला.

अखेरचे 6 षटक आणि द्रविडचा मेसेज

दिपक चहर आणि भुवनेश्वर कुमार यांनी अर्धशतकीय भागिदारी केली आणि 44 व्या षटकापर्यंत 241 धावा फटकावून दिल्या होत्या. अखेरच्या 6 षटकात टीम इंडियाला विजयासाठी 35 धावांची गरज होती. याचवेळी श्रीलंका दौऱ्यावरील हिंदुस्थानी संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविड डगआऊटमध्ये आला आणि दिपकचा भाऊ राहुलकडे एक मेसेज दिला. या मेसेजमुळेच आपण संघाला विजयी करू शकलो असा खुलासा दिपकने सामना संपल्यानंतर केला.

काय होता तो मेसेज?

राहुल द्रविड याने डगआऊटमध्ये येत राहुल चहर याला एक मेसेज दिला. ‘तुला शेवटपर्यंत खेळायचे आहे… प्रत्येक चेंडू खेळून काढ’, असा संदेश राहुल सरांनी माझ्यासाठी पाठवला होता आणि मी देखील त्याप्रमाणेच केले, असे दिपक चहर ‘सामनावीर’चा पुरस्कार स्वीकारताना म्हणाला. तसेच राहुल सरांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. माझ्यासाठी हा गेम चेंजर सामना होता, असेही दिपक म्हणाला.

deepak

सूर्यकुमारचे अर्धशतक

पहिल्या फळीतील फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर मधल्या फळीत फलंदाजीला आलेला सूर्यकुमार यादव याने अर्धशतक ठोकले. बाद होण्यापूर्वी त्याने 44 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 53 धावा केल्या. यादवसह कृणाल पांड्या यानेही 35 धावांचे योगदान दिले.

राज कुंद्राच्या अटकेनंतर अजिंक्य रहाणे ट्रोल, जुने संभाषण व्हायरल

आपली प्रतिक्रिया द्या