
हिंदुस्थान आणि श्रीलंका संघात तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील अखेरचा सामना कोलंबो येथे खेळला गेला. यजमान श्रीलंकेने विजयासाठीचे 82 धावांचे आव्हान 15 व्या षटकात 3 गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत 7 विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने मालिकाही 2-1 ने जिंकली.
तत्पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार शिखर धवन याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र हा निर्णय टीम इंडियाच्या अंगाशी आला आला. टीम इंडियाला निर्धारित 20 षटकात 8 बाद 81 धावा करता आल्या.
नाणेफेक जिंकून सलामीला आलेला शिखर धवन शून्यावर बाद झाला. यानंतर टीम इंडियाचे फलंदाज एकामागोमाग एक बाद होत गेले. टीम इंडियाकडून सर्वाधिक धावा नाबाद 23 कुलदीप यादवने केल्या. भुवनेश्वर कुमारने 16 आणि ऋतुराज गायकवाडने 14 धावांचे योगदान दिले. इतर फलंदाज फक्त हजेरी लावून गेले. हिंदुस्थानच्या 7 फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. लंकेकडून हसरंगा याने 9 धावा देऊन सर्वाधिक 4 बळी घेतले.
हिंदुस्थानचा संघ –
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडिकल, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), नितिश राणा, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), कुलदीप यादव, राहुल चहर, संदीप वॉरिअर, चेतन सकारिया आणि वरुण चक्रवर्ती.
Hello & Good Evening from Colombo! #TeamIndia have won the toss & elected to bat against Sri Lanka in the third & final #SLvIND T20I of the series.
Follow the match https://t.co/E8MEONwPlh
Here’s India’s Playing XI pic.twitter.com/QaQL0664Z9
— BCCI (@BCCI) July 29, 2021




























































