India Pakistan Ceasefire : युद्धविरामावर एकमत, पण दहशतवाद विरोधात कुठलीही तडजोड करणार नाही – एस जयशंकर

हिंदुस्थान आणि पाकिस्तानात युद्धविरामासंदर्भात एकमत झालं आहे. मात्र हिंदुस्थान दहशतवादाविरोधात कुठलीही तडजोड करणार नाही, असं वक्तव्य परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी केलं आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी दोन्ही देशांमध्ये युद्धविरामासंदर्भात एकमत झाल्याची माहिती दिली आहे.

X वर पोस्ट करत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले आहेत की, दोन्ही देशांमध्ये युद्धबंदी झाली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबविण्यास सहमती दर्शविली आहे. हिंदुस्थान दहशतवादाविरोधात कुठलीही तडजोड करणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

पाकिस्ताननेही केली युद्धबंदीची घोषणा

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी X वर पोस्ट केले आहे की, पाकिस्तान आणि हिंदुस्थान यांनी युद्धबंदीवर सहमती दर्शविली आहे. त्यांनी असा दावा केला की, पाकिस्तानने नेहमीच आपल्या सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेशी तडजोड न करता या प्रदेशात शांतता आणि सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले आहेत.