Pahalgam Terror Attack – हिंदुस्थानकडून पाकिस्तानची आर्थिक कोंडी, आयात-निर्यातीवर पूर्णपणे बंदी

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानची नाकेबंदी करण्यास सुरुवात केली आहे. पडद्यामागे बऱ्याच हालचाली सुरू असतानाच आता हिंदुस्थानने पाकिस्तानला मोठा दणका दिला आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढत असतानाच आता हिंदुस्थानने पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी झाली आहे. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी याबाबत निर्णय घेतला असून पाकिस्तानसोबतचे सर्व आर्थिक संबंध पूर्णपणे तोडण्याच्या दिशेने केंद्र सरकारकडून पावले टाकली जात असल्याचे हे द्योतक आहे.

पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानकडून कोणतीही वस्तू हिंदुस्थानमध्ये येणार नाही. राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक धोरणाच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने शनिवारी एक पत्रक जारी करत स्पष्ट केले. ही बंदी तत्काळ लागू होणार आहे.