
भाजपशासित कर्नाटकात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बंगळुरू, कलबुर्गी, दक्षिण कन्नडा, हसन, शिवमोगा, चिकमंगळुरसह अनेक जिल्हय़ांमध्ये जोरदार आंदोलन झाले. मंगळुरू येथे पोलीस ठाण्यावर जमावाने हल्ला केला. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जलील कुद्रोली आणि नौशीन यांचा मृत्यू झाला. बंगळुरूमध्ये इतिहासकार रामचंद्र गुहा यांनाही अटक करण्यात आली.
- बिहार – अनेक शहरांमध्ये आंदोलने झाली. राज्याच्या अनेक भागांत बंद पाळण्यात आला. माकप कार्यकर्त्यांनी पाटणा, दरभंगा आणि खगडिया येथे रेल्वे रोको केला. जहानाबाद येथे 10 आणि 83 हे दोन्ही महामार्ग रोखण्यात आले. पाटणा जंक्शन येथे एका रुग्णवाहिकेचीही तोडफोड करण्यात आली. रेल्वे सेवा अनेक ठिकाणी बंद होती.
- तेलंगणा – हैदराबादेत चारमिनार परिसरातून पोलिसांनी 50 आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले. राज्यातील काही शहरांत निषेध आंदोलने झाली; पण हिंसक घटना घडलेल्या नाहीत.
- पश्चिम बंगाल – डाव्या पक्षांनी आज बंदला पाठिंबा दिला होता. त्यांनी काही ठिकाणी निदर्शनेही केली. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली कोलकाता येथे रॅली काढण्यात आली. रॅलीत घंटानाद आंदोलन करण्यात आले.
- तामीळनाडू – चेन्नईत आंदोलन झाले. त्यात काही संघटना, कार्यकर्त्यांसह श्रीलंकेचे शरणार्थीही सहभागी झाले होते. जनतेचा आवाज पोलिसांनी दाबू नये, असे आवाहन अभिनेते कमल हासन यांनी केले आहे.
- पूर्वोत्तर – आसाम आणि मेघालयात आज बंद शांततेत झाला. काँग्रेस नेते हरीश रावत हे गुवाहाटी येथील आंदोलनात सहभागी झाले होते. आसामातील संचारबंदी 14 तास शिथील करण्यात आली असून मेघालयातील इंटरनेट बंदी हटवण्यात आलेली नाही.

























































