
सीमांवरील परिस्थिती पाहता चीन आणि पाकिस्तान हे एकत्र हल्ला हिंदुस्थानवर करू शकतात. या हल्ल्याचा मुकाबला करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराला सज्ज राहावे लागेल असा सतर्कतेचा इशारा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) जनरल बिपीन रावत यांनी दिला आहे.
हिंदुस्थान-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरममध्ये रावत बोलत होते. पाक व्याप्त कश्मीरात चीनकडून पाकिस्तानला आर्थिक आणि लष्करी मदत दिली जात आहे. यावर हिंदुस्थानला काळजीपूर्वक लक्ष ठेवावे लागेल. उत्तर सीमेवरील पाकिस्तानचे प्रयत्न हाणून पाडले.मात्र पूर्व आणि पश्चिम सीमेवरील धोका वाढला आहे.चीन आणि पाकिस्तान एकत्र येऊन धोका निर्माण करून हल्ला करू शकतात, असे रावत म्हणाले.

























































