हवाई क्षेत्र बंद करत हिंदुस्थानचा पलटवार

Delhi-bound US flight escorted by fighter jets to Rome after bomb hoax

पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानबाबत अनेक कठोर निर्णय घेतले. आता पाकिस्तानच्या विमान कंपन्यांना हिंदुस्थानचे हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पाकिस्तानी विमान कंपन्यांच्या कोणत्याही विमानाला हिंदुस्थानच्या हवाई हद्दीत प्रवेश करता येणार नाही. आजपासून 23 मेपर्यंत ही बंदी राहणार आहे.

हिंदुस्थानचे हवाई क्षेत्र बंद झाल्याने आता पाकिस्तानच्या विमान उड्डाणांना चीन आणि श्रीलंका अशा मार्गाने विमाने वळवावी लागतील. त्यामुळे त्यांचे विमानभाडे आणि उड्डाणांचा कालावधीही वाढणार आहे. त्याचा फटका पाकिस्तानी ग्राहकांना बसणार आहे. त्याचबरोबर जी विमान उड्डाणे आधीच शेडयुल्ड आहेत ती रद्द करावी लागणार आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या रोषाचा सामना पाकिस्तानी विमान कंपन्यांना करावा लागणार आहे. दरम्यान, पाकिस्तानने 24 एप्रिल रोजी हिंदुस्थानी विमान कंपन्यांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. त्याचाही फटका पाकिस्तानलाच बसणार असून तेथील विमान कंपन्यांना लाखो डॉलर्सचे नुकसान होण्याची शक्यता आहे.