कोरोनाबाधितांच्या संख्येने पार केला 58 लाखांचा टप्पा

देशात कोरोनाचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याची संख्या वाढत असली तरी दिवसागणिक नोंद होणाऱया कोरोनाबाधितांची संख्याही मोठी आहे, तर दुसरीकडे रुग्णांच्या मृत्यूची संख्याही वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये देशात 86 हजार 052 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1 हजार 141 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 58 लाखांचा टप्पा पार केला आहे, तर दुसरीकडे देशात एका दिवसात 6 कोटी 89 लाख 28 हजार 440 विक्रमी चाचण्यांचीही नोंद करण्यात आली आहे.

देशात सध्या 9 लाख 70 हजार 116 रुग्णांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 47 लाख 56 हजार 165 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर आतापर्यंत 92 हजार 290 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. दुसरीकडे देशातील कोरोनाच्या चाचण्यांची संख्याही मोठय़ा प्रमाणात वाढविण्यात येत आहे. गेल्या चोवीस तासांत देशात 14.92 लाखांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत. 24 सप्टेंबरपर्यंत चाचण्या केलेल्या एकूण 6 कोटी 89 लाख 28 हजार 440 नमुन्यांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले की दिल्ली कोरोनाच्या दुसऱया लाटेच्या शिखरावर पोहोचली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या