देशातील कोरोना मुक्तीने  गाठला 50 लाखांचा टप्पा

कोरोनाच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असताना दुसरीकडे यातून बरे होणाऱयांची संख्याही कमालीची वाढत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. गेल्या चोवीस तासांत कोरोनातून 92 हजार 43 लोक बरे झाले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनातून बरे होणाऱयांची संख्या 50 लाखांच्या आसपास पोहचली आहे. दरम्यान, 39 लाख 85 हजार 225 नव्या ऑक्टिव्ह केससची नोंद झाल्याची माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली.

गेल्या काही दिवसांपासून एक दिवसात सरासरी 90 हजारांहून अधिक लोकांनी कोरोनावर मात केल्याचे मंत्रालयाने अधोरेखित केले आहे. सकाळी 8 वाजता अद्ययावत करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशात चोवीस तासांच्या कालावधती एकूण 92 हजार 43 जण कोरोनातून मुक्त झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर याच कालावधीत 88 हजार 600 नवीन कोरोना संक्रमित झाल्याचे नोंद झाली आहे. वाढीचा कल कायम ठेवत नॅशनल रिकव्हरी रेटने सध्या 82.46 टक्क्यांपर्यंत मजल मारल्याचे मंत्रालयाने ठळकपणे नमूद केले आहे.

राज्यातील 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्ण संख्येच्या तुलनेत यातून बरे होणाऱयांची संख्या अधिक आहे. यात नव्याने कोरोनातून बरे झालेल्यापैकी एकूण76 टक्के प्रकरणे 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात आढळली आहेत.यात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश,तामीळनाडू, कर्नाटक, ओडिशा, दिल्ली,छत्तीसगड, केरळ आणि पश्चिम बंगाल यांचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या