
देशातील कोरोनाग्रस्तांचा गेल्या 24 तासातील आकडा 77,266 वर पोहोचला आहे. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. देशात आतापर्यंत 61,529 जणांचा मृत्यू झाला असून त्यातील 1057 जणांचा मृत्यू हा गेल्या 24 तासात झाला आहे.
सध्या देशाक 33,87,501 रुग्ण असून त्यातील 7,42,023 रुग्ण अॅक्टिव्ह आहेत तर 25,83, 948 कोरोनाग्रस्तक बरे झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. कोरोनाचे वेळीच निदान करण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढवले आहे. गुरुवारी तब्बल 9 लाख 57 हजार 998 नमुने तपासण्यात आले. देशात बुधवारपर्यंत एकूण 3 कोटी 95 लाख चाचण्या करण्यात प्रशासनाला यश आले.
महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनामुक्त होणाऱया रुग्णांची संख्या आता 5 लाखांवर पोहचली आहे. आज दिवसभरात राज्यात एकूण 9 हजार 136 रुग्ण बरे होऊन घरी परतले असल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. तर गेल्या 24 तासांत राज्यात तब्बल 14 हजार 718 जणांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनामुळे 355 जणांचे मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाने जाहीर केले आहे.



























































