
महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्ण संख्येत वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासात नोंदवल्या गेलेल्या रुग्ण संख्येपैकी 78.41% रुग्ण या पाच राज्यातले आहेत. गेल्या 24 तासात 26,291 नव्या रुग्णांची नोंद झाली.
महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे 16,620 (दैनंदिन नव्या रुग्णांच्या 63.21%) नव्या रुग्णांची नोंद झाली. केरळ 1,792 तर पंजाबमध्ये 1,492 नव्या रुग्णांची नोंद झाली.
हिंदुस्थानातील एकूण सक्रीय रुग्ण संख्या आज 2,19,262 असून ही हिंदुस्थानच्या एकूण पॉझीटीव्ह रुग्णसंख्येच्या 1.93% आहे. देशाच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 77% महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब या तीन राज्यात आहे. देशाच्या एकूण सक्रीय रुग्ण संख्येपैकी 58% पेक्षा जास्त केवळ महाराष्ट्रात आहेत.
आज सकाळी सात वाजता प्राप्त झालेल्या अहवालानुसार 2,99,08,038 लसीच्या मात्रा 5,13,065 सत्राद्वारे देण्यात आल्या. हिंदुस्थानात आतापर्यंत 1,10,07,352 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचा राष्ट्रीय दर 96.68% आहे.
गेल्या 24 तासात 17,455 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. नुकतेच बरे झालेल्यापैकी 84.10% जण 6 राज्यातले आहेत. महाराष्ट्रातएका दिवसात सर्वात जास्त म्हणजे 8,861 रुग्ण कोरोना मुक्त झाले. गेल्या 24 तासात 118 मृत्यू झाले. यापैकी 82.20% मृत्यू सहा राज्यातले आहेत.



























































