तृतीयपंथी अन् विधवांच्या मदतीसाठी ‘इंडिया फॉर मदर्स’; टिस्का चोप्रा, विकास खन्ना यांचा पुढाकार

अभिनेत्री टिस्का चोप्रा आणि शेफ विकास खन्ना यांनी कोरोनाच्या संकटात लोकांच्या मदतीसाठी धाव घेतली आहे. दोघांनी तृतीयपंथी आणि विधवा महिलांसाठी इंडिया फॉर मदर्स उपक्रम सुरू केला आहे.

नव्या अभियानाविषयी टिस्का सांगते, जेव्हा विकासच्या टीमने मला या उपक्रमाबद्दल विचारले तेव्हा मी लगेच तयार झाले. या केवळ पालनपोषण करणाऱया माता नाहीत. अनेक जणींचा रोजगार या काळात हिरावला गेला आहे. काही बेघर झाल्या आहेत. विधवा महिलांप्रमाणे अनेक तृतीयपंथीयांकडे सध्याच्या स्थितीत काम नाही. त्यांनाही आधार दिला पाहिजे.

टिस्का आणि विकास या दोघांनी ’मदर्स डे’च्या दिवशी गरजू कुटुंबांना धान्य पुरवण्याचे काम केले होते. वाराणसी, वृंदावन, दिल्ली, मुंबई आणि बंगळुरू येथील सुमारे 5 हजार कुटुंबांना धान्याची मदत केली होती. देशातील कोरोनाच्या दुसऱया लाटेमध्ये लोकांना ऑक्सिजन, आयसीयू बेड, प्लाझ्मा, औषधे यांची जास्त गरज असल्याचे मत तिने व्यक्त केले.

याआधीही टिस्काने टिस्काज् टेबलया नावाने एक उपक्रम सुरू केला होता. त्यातून कोरोना संकटात जीव धोक्यात घालून लढणाऱया  योद्धय़ांना मदत केली जाते. या उपक्रमाअंतर्गत नानावटी आणि कूपर रुग्णालयातील कोविड वॉर्डात काम करणाऱया नर्स आणि वॉर्डबॉय यांच्यासाठी जेवण पाठवले जाते. कोरोना योद्धय़ांच्या निःस्वार्थ सेवेला सलाम करण्यासाठी हा उपक्रम असल्याचे टिस्काने सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या