
सामना ऑनलाईन । जकार्ता
हिंदुस्थानी पुरुषांच्या हॉकी संघाचा मलेशियाने पराभव केल्यानंतर आज हिंदुस्थानी महिलांकडून क्रिडा रसिकांना सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मात्र आज झालेल्या हॉकीच्या अंतिम लढतीत जपानने हिंदुस्थानचा २-१ ने पराभव करत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्यामुळे हिंदुस्थानच्या महिला संघाला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. महिला संघाच्या पराभवामुळे हिंदुस्थानला ३६ वर्षांनंतर सुवर्ण पदक मिळवून देण्याचे स्पर्धकांचे स्वप्न भंगले आहे.
India get silver after losing 1-2 to Japan in women’s hockey finals #AsianGames2018 pic.twitter.com/BOWt2m2GVN
— ANI (@ANI) August 31, 2018
जपान आणि हिंदुस्थानच्या सामन्यात जपानची खेळाडू मिनामी शिमीझूने पहिला गोल करत जपानला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर २५ व्या मिनीटाला हिंदुस्थानच्या नेहा गोयलने गोल करून हिंदुस्थानला बरोबरीत आणून ठेवले. ब्रेकनंतर दोन्ही संघ एकमेकांवर अॅटॅक करत असताना जपानची कर्णधार मोटोमी कवुमाराने ४४ व्या मिनीटाला दुसरा गोल केला. त्यानंतर मात्र हिंदुस्थानला एकही गोल करता आला नाही. या सामन्यात हिंदुस्थानला पेनेल्टी शूट आऊटच्या बऱ्याच संधी मिळाल्या होत्या मात्र त्या संधीचे हिंदुस्थानला सोने करता आले नाही.
summary : India get silver after losing 1-2 to Japan in women’s hockey finals



























































