हिंदुस्थानात गेल्या दोन दशकांत वीज पडण्याच्या प्रमाणात वाढ, केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी दिली माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आकाशातील वीज पडण्याच्या घटनांवर देखरेख ठेवून त्यांची नोंद करण्यासाठी ‘दामिनी’ हे वीज विषयक अॅप विकसित करण्यात आले आहे, अशी माहिती, केंद्रीय पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री यांनी आज ही माहिती लोकसभेत दिली.

देशभरात वीज पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून या ऐपचा उद्देश वीज पडण्याशी संबंधित सर्व घडामोडींचा अभ्यास करुन त्यावर देखरेख ठेवणे आणि एखाद्या व्यक्तीच्या आसपास वीज कोसळणार असेल, तर त्याला जीपीएस च्या माध्यमातून त्याची पूर्वसूचना देणे हा आहे, असे, एका प्रश्नाला उत्तर देताना, जितेंद्र सिंह यांनी पुढे सांगितले. वीज पडणार असल्याच्या 20 किमीच्या परिसरात आणि 40 किमी त्रिज्येच्या परिसरात, या ऐपमुळे माहिती मिळू शकेल. या अॅपमध्ये सूचना आणि घ्यावयाची काळजी याविषयी सविस्तर माहितीही देण्यात आली आहे.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील, हिंदुस्थानी उष्ण कटिबंधीय हवामान संस्था (आयआयटीएम), पुणे या स्वायत्त संशोधन आणि विकास संस्थेने देशभरात, 83 ठिकाणी वीज स्थान नेटवर्क अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीने विकसित केले आहे. या आधारे, वीज कुठे पडू शकेल या याची जवळपास अचूक माहिती मिळू शकेल.

या नेटवर्कचे मध्यवर्ती प्रक्रिया केंद्र आयआयटीएम इथे असून वेगवेगळ्या नेटवर्क वरून आलेले सिग्नल्स या केंद्राला मिळतात आणि त्यानुसार पुढची प्रक्रिया केली जाते. या ऍपवरुन वीज कोसळण्याची जागा 500 मीटर पेक्षाही कमी अंतराच्या अचूकतेने सांगितली जाते. या नेटवर्कवरील आऊटपूट मग IMD ला सांगितले जाते

विविध कामांसाठी राज्यांचे सरकारी विभाग नाऊकास्ट हा अॅप हवामानाच्या अद्ययावत माहितीसाठी वापरतात. जो दर तीन तासांनी वीज कोसळणे, खराब हवामान,यांच्याविषयी माहिती देतो. राज्याच्या हवामान अध्ययन केंद्राद्वारे, सर्व जिल्ह्यांना ही माहिती कळवली जाते. सध्या ही सुविधा देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात उपलब्ध असून अशी 1084 केंद्रे सुरू आहेत.