ऑलिम्पियन खेळाडूंची स्वातंत्र्यदिनी विशेष उपस्थिती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी साधणार संवाद

टोकियो ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंना अद्याप चमकदार कामगिरी करता आलेली नाही. मीराबाई चानू व पी व्ही सिंधू या दोन खेळाडूंनी पदके जिंकली असून लव्हलीना बोर्गोहेन हिने पदक निश्चित केले आहे. पण इतरांना आपली धमक दाखवता आलेली नाही. मात्र ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानी खेळाडूंनी दाखवलेल्या जिगरबाज खेळाचे काैतुक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून येत्या 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी लाल किल्यावर होणाऱया झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला हिंदुस्थानच्या समस्त ऑलिम्पिक चमूला विशेष आमंत्रण देण्यात आलेले आहे.

टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळाडू व सपोर्ट स्टाफ मिळून हिंदुस्थानच्या 228 जणांची निवड झाली होती. येत्या रविवारपर्यंत हा क्रीडा महोत्सव सुरू राहणार आहे. त्यानंतरच्या पुढील आठवड्यात हिंदुस्थानचा स्वातंत्रदिन साजरा होणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या निवासस्थानी ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंशीही संवाद साधणार आहेत. अशी माहिती सूत्रांकडून यावेळी देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या