पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानच अधिक असुरक्षित! पीसीबी अध्यक्ष एहसान मनी यांची मुक्ताफळे

353

पाकिस्तानातील अतिरेकी कारवायामुळे तेथील क्रिकेट तब्बल दहा वर्षांपासून ठप्प आहे. या वर्षी झेड प्लस सुरक्षाव्यवस्थेत श्रीलंका संघाने कसाबसा पाकिस्तानचा दौरा केला. मात्र, तरीही पाकिस्तानपेक्षा हिंदुस्थानच अधिक असुरक्षित असल्याची मुक्ताफळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष एहसान मनी यांनी सोमवारी उधळली.

पाकिस्तानात श्रीलंका क्रिकेट संघावर 2009मध्ये अतिरेकी हल्ला झाला होता. त्यानंतर क्रीडाविश्वाने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला. तब्बल 10 वर्षांनंतर श्रीलंका संघाला अनेकदा विनंत्या करून पाकिस्तानने दौऱयावर बोलावले. हा दौरा झाल्यानंतर लगेच ‘पीसीबी’चे अध्यक्ष एहसान मनी यांनी पाकिस्तानातील सुरक्षा हिंदुस्थानपेक्षा अधिक चांगली असल्याचे अकलेचे तारे तोडले. या श्रीलंका दौऱयाने पाकिस्तान देश आता क्रीडाविश्वासाठी सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे, असे पटवून देण्याचा त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला. श्रीलंका दौरा म्हणजे पाकिस्तान क्रिकेटसाठी महत्त्वपूर्ण टप्पा होय. क्रीडाविश्वात पाकिस्तानची प्रतिमा उंचावण्यासाठी मीडिया व चाहत्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली, असे कौतुकही मनी यांनी केले. श्रीलंका दौऱयानंतर आता बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानचा दौरा कराका असेही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या