लवकरच सोनी सबवर ‘इंडिया के मस्त कलंदर’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
poster of India ke mast kalandar

सामना  प्रतिनिधी । मुंबई

सोनी सब चॅनेल ‘इंडिया के मस्त कलंदर’ या नव्या शोच्या माध्यमातून विकेंड गाजवण्यास सज्ज झाले आहे. यामध्ये देशाभरातील प्रतिभावंतांचे कलागुण प्रेक्षकांना अनुभवता येतील. ऑनलाइन ऑडिशन्सच्या माध्यमातून स्पर्धकांची निवड करण्यात येत आहे. गायक मिका सिंग आणि गीता कपूर हे परीक्षकांच्या रूपात असतील तर सूत्रसंचालनाची धुरा मराठमोळा अभिनेता सुमित राघवन याच्या खांद्यावर आहे. येत्या २१ जुलैपासून सोनी सब चॅनेलवर ‘इंडिया के मस्त कलंदर’ हा कार्यक्रम सुरू होणार आहे. ‘इंडिया के मस्त कलंदर’ या व्यासपीठावर गाणं, फ्रिस्टाईल डान्स, रोबोट डान्स आणि बरंच काही स्पर्धकांना करता येईल.