Breaking – देशभरातील लॉकडाऊन 17 मेपर्यंत वाढवला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना व्हायरसने देशभरात थैमान घातलेले असल्यामुळे केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

देशभरातील जिल्ह्यांचे रेड, ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये वर्गीकरण करण्यात आले आहे. शून्य व गेल्या 21 दिवसात एकही कोरोनाग्रस्त आढळून न आलेले सर्व जिल्हे ग्रीन झोनमध्ये असणार आहेत. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण 15 पेक्षा जास्त आहेत, तेथील रुग्णसंख्या वाढण्याचा वेग जास्त आहे ते जिल्हे रेड झोनमध्ये येणार आहेत. जे जिल्हे रेड व ग्रीन झोनच्या वर्गवारीत बसत नाहीत तसेच जेथील रुग्णसंख्या ही 1 ते 15 च्या मध्ये आहे ते जिल्हे ऑरेंज झोनमध्ये असतील. या सर्व झोनमधील रेल्वे, हवाई मेट्रो सेवा बंद राहणार आहेत. तर शाळा कॉलेज विद्यापीठे, क्लासेस, ट्रेनिंग सेंटर, हॉटेल, रेस्टॉरंट्स, मोठे सोहळे, सिनेमागृह, व्यायामशाळा, सांस्कृतिक कार्यक्रम यांवर बंदी कायम राहणार आहे. तसेच सर्व झोनमधील वृद्ध नागरिक, 10 वर्षाखालील मुले, गरोदर महिला यांना बाहेर फिरण्यास मनाई करण्यात आली आहे.

देशाची तीन झोनमध्ये विभागणी, वाचा तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये

देशभरात लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी रेड झोन, ऑरेंज झोन व ग्रीन झोनमधील नागरिकांना काही सवलती देण्यात आल्या आहेत. ‘ग्रीन झोनमधील नागरिकांना जिल्ह्याअंतर्गत प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्याबाहेर प्रवास करता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सार्वजनिक वाहनांमधील प्रवासी क्षमता ही 50 टक्क्यांवर आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेड झोनमध्ये मीडिया, आयटी क्षेत्र, डेटा व कॉल सेंटर्स, कोल़्ड स्टोरेज, वेअर हाऊंसिंग ही क्षेत्रं सुरू राहणार आहेत. तर सलून मात्र सुरू न करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑरेंज झोनमधील टॅक्सी कॅब सेवा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र त्यातून फक्त एका प्रवाशाला प्रवास करण्याची परवानगी आहे

हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 35 हजाराच्या पार, मृतांचा आकडा 1,152 वर