अनलॉक 1.0; हे आहेत ड्रायव्हिंगचे नवीन नियम, घरातून बाहेर निघण्यापूर्वी जाणून घ्या..

4221

देशात अनलॉक 1.0 ची सुरुवात झाली आहे. अनेक दिवसांपासून लॉकडाऊनमुळे बंद असलेली शहरे आणि बाजारे हळूहळू सुरु होत आहेत. यासोबतच लोक सावधगिरी बाळगून घरातून बाहेर येत आहेत, तर गाड्याही रस्त्यावर धावताना दिसत आहे. अनलॉक 1.0 ची सुरुवात जर झाली असली तरी यात काही नियम व कायद्यांचे पालन करणे आवश्यक असेल. यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंगचे नियम. अनलॉक 1.0 मध्ये ड्रायव्हिंगचेही काही नियम आहेत. ते न पाळल्यास तुमच्याकडून दंड आकाराला जाऊ शकतो. अनलॉक 1.0 मध्ये दिल्ली, उत्तर प्रदेश आणि हरियाणा दरम्यान वाहन चालवण्याचे काही महत्त्वपूर्ण नियम बनविण्यात आले आहेत. ज्यांच्या बद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

काय आहेत नियम?

खाजगी वाहने चालवणाऱ्यांसाठी नियम आधीपासूनच निश्चित आहेत. वाहनात वाहनचालक व्यतिरिक्त फक्त दोन जण प्रवास करू शकतात. तसेच दुचाकीवर केवळ एक व्यतीत प्रवास करू शकते. वाहन चालवताना मास्क घालणे सक्तीचे असेल. तसेच रात्री 9 पासून कर्फ्यू असेल. रात्री 9 नंतर वाहन चालवताना दिसल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते. तसेच हे नियम न पाळल्यास ही दंडात्मक कारवाई होऊ शकते.

आपली प्रतिक्रिया द्या