
महाराष्ट्र, छत्तीसगड, कर्नाटक, पंजाब, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि मध्य प्रदेश या आठ राज्यांमध्ये कोविडच्या दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ सुरूच आहे. या 8 राज्यांमध्ये नवीन रुग्णांपैकी 84.61 टक्के रुग्ण आहेत.
गेल्या 24 तासांत 72,330 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक 39,544 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. त्याखालोखाल छत्तीसगडमध्ये 4,563 आणि कर्नाटकात 4,225 नवीन रुग्ण आढळले आहेत. हिंदुस्थानची एकूण सक्रिय रुग्णसंख्या 5,84,055 वर पोहोचली आहे. ही संख्या देशातील एकूण सकारात्मक रुग्णसंख्येच्या 4.78 टक्के आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, छत्तीसगड आणि पंजाब या पाच राज्यांमध्ये देशातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी एकूण 78.9 टक्के रुग्ण आहेत. एकट्या महाराष्ट्रात देशातील सक्रिय रुग्णसंख्येच्या 61 % हून अधिक सक्रिय रुग्ण आहेत.




























































