देशात गेल्या 24 तासात आढळले कोरोनाचे 72 हजारहून अधिक रुग्ण, एकूण रुग्णसंख्या 67 लाखांच्या वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 72 हजारहून अधिक रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णसंख्या 67 लाखांच्या वर गेली आहे.


गेल्या 24 तासात देशात 72 हजार 49 रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या 67 लाख 57 हजार 132 वर पोहोचली आहे. तसेच गेल्या 24 तासात 986 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 1 लाख 4 हजार 555 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 57 लाख 44 हजार 694 रुग्ण बरे झाले असून सध्या 9 लाख 7 हजार 883 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.